
सातारा : मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकार चालढकल करत आहे. मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण द्यायचे असेल तर राज्य शासन तोडगा काय काढणार? यावर भूमिका स्पष्ट करणे आवश्यक आहे. मात्र, आरक्षणासाठी नेमलेल्या उपसमितीच्या नावाखाली सरकार वेळ काढत आहे. मनोज जरांगे यांनी आंदोलनाबाबत दोन महिन्यांपूर्वी जाहीर केले असतानाही राज्य शासनाने त्यांना चर्चेला का बोलावले नाही? असा प्रश्न उपस्थित करत मराठा आरक्षणाच्या संदर्भात राज्य सरकारचा आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न सुरू असल्याची टीका राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी आज पत्रकार परिषदेत केली.