कोरोना इफेक्ट : ग्रेड सेपरेटरच्या कामाला कामगारांमुळे ब्रेक 

Grade Seprator Work Affected Due to Corona
Grade Seprator Work Affected Due to Corona

सातारा : कोरोनाच्या लॉकडाउनचा सर्व घटकांवर परिणाम झाला आहे. बंदमध्ये सातारा शहरात सुरू असलेल्या ग्रेड सेपरेटरच्या कामावरील 65 ते 70 कामगार घरी गेल्याने या कामाचा वेग मंदावला आहे. सध्या केवळ यंत्रांच्या साह्याने उपलब्ध असलेल्या कामगारांच्या जिवावर काम सुरू आहे. सध्या हे काम अंतिम टप्प्यात असून, दिलेल्या मुदतीत म्हणजे डिसेंबरपर्यंत कोणत्याही परिस्थितीत हे काम पूर्ण होणार असल्याचे बांधकाम विभागाकडून सांगण्यात येत आहे. 

सातारा शहराचे नाक असलेल्या पोवई नाका परिसरातील वाहतुकीच्या कोंडीवर पर्याय म्हणून ग्रेड सेपरेटरचे काम हाती घेण्यात आले. खासदार उदयनराजे भोसले व आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या प्रयत्नामुळे हे काम मंजूर झाले. साधारण 75 कोटींचे हे काम असून, टी ऍण्ड टी इन्फ्रा कंपनीकडे या कामाचा ठेका आहे.

सुरवातीपासूनच कंपनीने वेगाने काम करून रयत शिक्षण संस्था ते सातारा तहसील कार्यालय ही लेन पूर्ण केली आहे. त्यापाठोपाठ पंचायत समितीपर्यंतचेही काम पूर्ण झाले आहे. आता केवळ लाइटची सोय करणे, डांबरीकरण तसेच इतर किरकोळ कामे सुरू आहेत.  पोवई नाका ते पेंढारकर हॉस्पिटल या तिसऱ्या लेनचे काम अंतिम टप्प्यात आहे.

पण, लॉकडाउनमुळे या कामांवरील 65 ते 70 कामगार गावी निघून गेले आहेत. त्यामुळे या कामाची गती कमी झाली आहे. सध्या तिसऱ्या लेनचे स्लॅबचे काम पूर्ण झाले असून, पेंढारकर हॉस्पिटलसमोरचे काम युध्दपातळीवर सुरू आहे. सध्या उपलब्ध असलेल्या कामगारांवर व यंत्रणेच्या माध्यमातून आगामी पावसाळ्यातही काम सुरू ठेवावे लागणार आहे. तिसऱ्या लेनचे काम पूर्ण होण्यास नोव्हेंबर महिना उजाडण्याची शक्‍यता आहे. 

डिसेंबरपर्यंत डेडलाइन 
संपूर्ण काम डिसेंबर 2020 पर्यंत पूर्ण करावे लागणार आहे. तरीही सध्या उपलब्ध कामगारांच्या माध्यमातून ठेकेदार कंपनी हे काम डिसेंबरपर्यंत पूर्ण करणार असल्याचे बांधकाम विभागाचे अधिकारी सांगत आहेत. मध्यंतरी काम पूर्ण झालेल्या रयत शिक्षण संस्था ते तहसील कार्यालय या लेनचे उद्‌घाटन करण्याचे नियोजन खासदार उदयनराजे भोसले यांच्या समर्थकांनी केले होते. मात्र, कामातील काही गोष्टी अपूर्ण असल्याने ही लेन सुरू केलेली नाही. पावसाळ्यात ही एक लेन सुरू झाल्यास वाहतुकीची समस्या सुटणार आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com