Gram Panchayat Employee: 'साताऱ्यात ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा ठिय्या'; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सात दिवसांपासून आंदोलन, सरकारविरोधात घोषणाबाजी

Government Criticized: ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांनी वेळकाढू धोरण घेतल्याचा आरोप आंदोलकांनी केला. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांच्यासोबत चर्चा झाल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
Satara Gram Panchayat employees continue their 7-day sit-in protest outside the Collector’s Office with strong slogans against the government.

Satara Gram Panchayat employees continue their 7-day sit-in protest outside the Collector’s Office with strong slogans against the government.

Sakal

Updated on

सातारा: विविध मागण्यांसाठी ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाने आज शहरातील हुतात्मा उद्यान ते पोवई नाकामार्गे जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारावर मोर्चा काढला. गेल्या सात दिवसांपासून आंदोलनाची दखल न घेतल्याने संतप्त झालेल्या महासंघाच्या आंदोलकांनी जोरदार निदर्शने करत जिल्हा परिषदेसमोर ठिय्या मांडला. ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांनी वेळकाढू धोरण घेतल्याचा आरोप आंदोलकांनी केला. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांच्यासोबत चर्चा झाल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com