Mhaswad News: सिद्धनाथ- जोगेश्वरीचा शाही थाटात विवाह; म्हसवडला भाविकांची अलोट गर्दी; सनई- चौघडा अन् ढोल-ताशांचा गजर

तब्बल महिनाभर चालणाऱ्या ‘श्रीं’च्या मंगल विवाह सोहळ्याचा प्रारंभ दिवाळी पाडव्यादिवशी घटस्थापना, नवरात्रारंभ व ‘श्रीं’च्या हळदी समारंभाने झाला. तुलसी विवाहादिवशी पहाटे साडेपाच वाजता मंदिराचे मुख्य पुजारी, सालकारी रामचंद्र गुरव यांच्या हस्ते आरती करून मानकरी, सेवेकरी व नवरात्रकरींच्या उपस्थितीत ‘श्रीं’चे १२ दिवसांचे घट उठविण्यात आले.
“Devotees throng Mhaswad for the grand Siddhanath–Jogeshwari wedding; temple town resonates with drums and devotion.”

“Devotees throng Mhaswad for the grand Siddhanath–Jogeshwari wedding; temple town resonates with drums and devotion.”

Sakal

Updated on

म्हसवड: लाखो भाविकांचे कुलदैवत व येथील ग्रामदैवत श्री सिद्धनाथ व देवी जोगेश्वरी यांचा शाही विवाह सोहळा तुलसी विवाहादिवशी रात्री १२ वाजता धार्मिक विधीपूर्वक, पारंपरिक पद्धतीने भाविकांच्या अलोट गर्दीत शाही थाटात झाला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com