Electric Shock
esakal
गोंदवले - मार्डी (ता. माण) येथील काळेवस्तीजवळ विजेच्या तुटून पडलेल्या तारेला अडकलेल्या शेळीचा जीव वाचवण्यासाठी धावलेल्या तेरा वर्षीय नातवाचा आणि त्याला वाचवण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालणाऱ्या आजीचाही विजेच्या भीषण धक्क्याने जागीच मृत्यू झाला. सौ. मालन विलास काळे (वय-६०) व सुजित युवराज काळे (वय-१३) अशी मृतांची नावे आहेत. या दुर्दैवी घटनेने काळे कुटुंबासह संपूर्ण गावावर शोककळा पसरली.