esakal | आता कसं हाेणार? अनिल अंबानींपुढे निर्माण झालाय पेच
sakal

बोलून बातमी शोधा

Anil Ambani

आता कसं हाेणार? अनिल अंबानींपुढे निर्माण झालाय पेच

sakal_logo
By
अभिजीत खूरासणे, सिद्धार्थ लाटकर

महाबळेश्वर : प्रसिध्द उदयोगपती अनिल अंबानी Anil Ambani हे आपली पत्नी टिनासह ज्या मैदानावर इव्हिनिंग वॉक घेत होते त्या मैदानाची मालकी असलेल्या संस्थेला महाबळेश्वर Mahableshwar पालिकेने नोटीस बजावुन दंडात्मक कारवाईचा इशारा दिला आहे. पालिकेने नोटीस बजावल्याने दि क्लबने गोल्फ मैदानाला टाळे ठोकले आहे. आता या मैदानावर कोणालाही प्रवेश दिला जात नाही. त्यामुळे उदयोगपती अंबानींच्या इव्हिनिंग वॉकला ब्रेक लागला आहे.

महाराष्ट्राचे नंदनवन म्हणुन महाबळेश्वर हे प्रसिध्द आहे येथील थंड हवा आणि निसर्ग पाहण्यासाठी देशातील अनेक नामवंत हे नेहमी आपल्या कुटूंबाबरोबर येथे वरचेवर येत असतात. उदयोग विश्वात ज्यांच्या नावाचा बोलबाला आहे असे अंबानी बंधु हे देखिल आपल्या कुटूंबा बरोबर वरचेवर महाबळेश्वरला भेट देतात. मुकेश अंबानींचे देखिल महाबळेश्वरवर नितांत प्रेम आहे. त्यांनी आपली मुलीचा साखरपुडयाचा कौटुंबिक सोहळा येथेच नुकताच आयोजित केला होता.

हेही वाचा: अरं बाबा, काेण म्हणतं फुकट हाय; 200 रुपये जात्यात लशीसाठी

मुकेश अंबानी प्रमाणे त्यांचे बंधु अनिल अंबानी हे देखिल नेहमी कुटूंबासह महाबळेश्वरला नेहमी येत असतात. अनिल अंबानी हे आपली पत्नी टिना अंबानीसह महाबळेश्वर येथे आले आहेत. ते सध्या देशातील डायमंड किंग म्हणुन प्रसिध्द असलेले उदयोगपती अनुम मेहता यांच्या लाल बंगल्यात मुक्कामी आहेत. गेली अनेक दिवस येथे मुक्कामी असलेले उदयोगपती अनिल अंबानी यांना रोज सकाळ आणि संध्याकाळी वॉकसाठी बाहेर पडण्याची सवय आहे. मुंबई असो वा महाबळेश्वर ते त्यांचा नित्यमक्रम (वॉक) कधीच चुकवित नाहीत. वॉकची सवय असलेले अनिल अंबानी हे रोज सायंकाळी आपली पत्नी टिना अंबानीसह येथील गोल्फ मैदानावर येतात. याच ठिकाणी गावातील काही मोजकी मंडळी देखिल नियमित येत असतात.

सध्या या मैदानावर अनिल हे आपल्या पत्नीसह रोज वॉकसाठी येतात याची खबर शहरात पसरली. त्यामुळे वॉकसाठी जी काही मंडळी इतर ठिकाणी जात होती, त्यांनी आपली रोजची जागा बदलुन येथील गोल्फ मैदानावर येण्यास प्रारंभ केला. त्यामुळे हळु हळु या मैदानावर नागरीकांची गर्दी होवु लागली. लॉकडाउनमध्ये संचारबंदी असुन कोणालाही बाहेर पडता येत नाही असे नियम असतानाही अनिल अंबानी हे नियमित वॉक घेण्यासाठी गोल्फ मैदानावर येतात याची माहिती पालिकेच्या मुख्याधिकारी पल्लवी पाटील यांना मिळाली. त्यांनी तातडीने याबाबत खात्री करून गोल्फ मैदानाची मालकी असलेल्या 'दि क्लब' या संस्थेच्या सचिवांना नोटीस काढली.

हेही वाचा: महामार्ग ओलांडण्याचे 'शॉर्टकट' ठरताहेत जीवघेणे; कऱ्हाडात तब्बल 200 जणांचा मृत्यू

या नोटीसमध्ये मुख्याधिकारी यांनी म्हटले आहे की सध्या लॉकडाउन नियामांतर्गत संचार बंदी जाहीर करण्यात आली आहे असे असताना आपल्या मालकीच्या गोल्फ मैदानावर शहरातील अनेक नागरीक इव्हिनिंग वॉकसाठी येत आहेत. आपण तातडीने गोल्फ मैदान वॉकसाठी बंद करावे व या ठिकाणी वॉकसाठी नागरीकांना मनाई करावी. अन्यथा आपले विरूध्द आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 चे कलम 51 ते 60, भा द वि कलम 188 तसेच भारतीय साथ रोग अधिनियम 1897 अन्वये दंडात्मक कारवाई करण्यात येईल. पालिकेने बजावलेल्या या नोटीसीची दि क्लबने दखल घेत गोल्फ मैदानाला टाळे ठोकले. या बराेबरच प्रवेशव्दारावर नागरीकांनी मैदानावर जाऊ नये यासाठी फलक लावला आहे. पालिकेने घेतलेल्या या धाडसी निर्णयाचे शहरातुन कौतुक होत आहे. दरम्यान आता इव्हिनिंग वॉकसाठी कुठे जायचे हा प्रश्न उदयोगपती अनिल अंबानी यांना पडल्याची चर्चा महाबळेश्वरात सुरु आहे.

हेही वाचा: पुणे मुंबईकरांनाे! एसटी महामंडळाने घेतला महत्वपुर्ण निर्णय

loading image