
सातारा : जिल्ह्याच्या पर्यटनवाढीला चालना देण्यासाठी सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या पाठपुराव्यातून राजधानी साताऱ्यातील किल्ले अजिंक्यतारा किल्ल्याचे जतन, संवर्धन आणि सुशोभीकरण करणे, पर्यटकांसाठी पायाभूत सुविधा देणे, तसेच संगम माहुली येथील महाराणी ताराराणी, येसूबाई राणीसाहेब, छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधीस्थळांचे संवर्धन, जीर्णोद्धार आणि संगम माहुलीचा संपूर्ण परिसर विकसित करणे या कामांना उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी आज हिरवा कंदील दाखवला. या कामाचा परिपूर्ण प्रस्ताव तातडीने शासनाकडे सादर करण्याच्या सूचना त्यांनी जिल्हा प्रशासनाला या वेळी केल्या. त्यामुळे किल्ले अजिंक्यतारा आणि संगम माहुली परिसराचा कायापालट होणार आहे.