Video पहा : असा झाला 'ग्रिफॉन'चा 900 किलोमीटर प्रवास

केरळच्या वायनाड ते कोयनेच्या जंगली जयगडपर्यंतचे 900 किलोमीटरचा प्रवास "ग्रिफोन'ने केला आहे.
griffon vulture
griffon vulturesystem
Summary

केरळच्या वायनाड ते कोयनेच्या जंगली जयगडपर्यंतचे 900 किलोमीटरचा प्रवास "ग्रिफोन'ने केला आहे.

कऱ्हाड (जि. सातारा) : सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील (sayhadri tiger reserve project) कोयनेच्या (koyna) जंगली जयगड परिसरात नोंदवलेले "ग्रिफॉन' गिधाड (griffon vulture) केरळच्या वायनाड अभयारण्यातून (wayanad sanctuary kerala) तब्बल 900 किलोमीटरचा प्रवास करून सह्याद्रीच्या डोंगर कपारीत आले आहे. वन विभाग व पक्षी तज्ज्ञांनी टॅगवरून त्याच्या प्रवासाचा उलगडा केला आहे. त्यामुळे "ग्रिफॉन' गिधाड पक्षी निरीक्षकांसाठी पर्वणी ठरले आहे. (griffon-vulture-travel-sayhadri-tiger-reserve-project-koyna-wayanad-sanctuary-kerala-satara-news)

केरळच्या कन्नूर जिल्ह्यातील चक्करक्कल येथे 28 डिसेंबरला "ग्रिफॉन' जखमी अवस्वथेत वन विभागास सापडले. औषधोपचारासाठी ते "ग्रिफॉन' केरळच्या मलबार जागरूकता व वन्यजीव बचाव केंद्राकडे ठेवले. बॉम्बे नेचरल हिस्ट्री सोसायटीचे उपसंचालक तथा मुख्य शास्त्रज्ञ विभू प्रकाश यांच्या सल्ल्यानुसार केरळ वन विभाग व पक्षी तज्ज्ञ आर. रोश्नाथ, सी. सशीलकुमार यांनी त्याच्या पंखाला स्थलांतराचा अभ्यासासाठी नारंगी टॅग आणि पायाला रिंग लावली. 31 जानेवारीला वायनाडमध्ये "ग्रिफॉन'ला मुक्त करण्यात आले. टॅगवर इंग्रजी अक्षर "L8' असे लावले. सोडलेले "ग्रिफॉन' काही दिवस वायनाड येथेच घिरट्या घालत होते. त्यानंतर ते थेट सह्याद्रीच्या जंगलात दिसले. केरळच्या वायनाड ते कोयनेच्या जंगली जयगडपर्यंतचे 900 किलोमीटरचा प्रवास "ग्रिफोन'ने केला आहे.

griffon vulture
FACT CHECK : सातारकरांनो! तुमच्या मोबाईलवर आलेला बिबट्याचा VIDEO सोनगावचा नाही

वनक्षेत्रपाल स्न्हेल मगर व वनरक्षक संतोष चाळके यांनी "ग्रिफॉन'चे काढलेली छायाचित्रे मानद वन्य जीवरक्षक रोहन भाटे यांनी गिधाड संवर्धनवर काम करणाऱ्या देश, परदेशातील महत्त्वाच्या संस्था, पक्षी तज्ज्ञांना पाठवली. त्यानुसार त्यांच्या मेलवर काही तासांतच बॉम्बे नेचरल हिस्ट्री सोसायटीचे उपसंचालक विभू प्रकाश यांनी रिप्लाय दिला. भाटेंशी संपर्क साधून त्यांनी गिधाडाची माहिती दिली. त्यामुळे "ग्रिफॉन'च्या प्रवासाचा उलगडा झाला. सह्याद्रीत "ग्रिफॉन' आढळल्याने त्याच्या निरीक्षणासाठी प्रोटोकॉल तयार केला आहे. "ग्रिफॉन' हा 400 किलोमीटरमध्ये घिरट्या मारतो. त्यामुळे पश्‍चिम महाराष्ट्रसह पुण्याकडील पश्‍चिम भागात पक्षी निरीक्षण करणाऱ्यांनी गिधाड दिसल्यास छायाचित्र काढून संपर्क करावा, त्याद्वारे "ग्रिफोन'च्या प्रवासाचा उलघडा होईल व नोंदी ठेवण्यास मदत होईल, असे आवाहन भाटेंनी केले आहे.

griffon vulture
उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीनंतरही परिस्थिती जैसे थे

असा झाला ग्रिफॉनचा प्रवास...

"ग्रिफॉन' गिधाड हे केरळ, वायनाड येथून तमिळनाडूमधील कोईमतूर येथे पक्षी निरीक्षकाला दिसले. त्याने त्याचे छायाचित्रही काढले आहे. पुढे 28 फेब्रुवारीला "ग्रिफॉन' पुन्हा वायनाडच्या जंगलात एका मृत चितळ खाताना वनाधिकारी व पक्षी अभ्यासक रोश्नाथ रमेश यांना दिसले. त्यांनीही त्याचे छायाचित्र काढले. त्यादिवशी "ग्रिफॉन'ने अवकाशात भरारी घेतली. ते भागातून दिसेनासे झाला. तब्बल दोन महिन्यांनंतर आता "ग्रिफॉन' गिधाड सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामध्ये आढळून आले आहे. "ग्रिफॉन'ने केरळपासून सह्याद्री व्याघ्र प्रकल्पापर्यंत 900 किलोमीटरच्या केलेल्या प्रवासाची निरीक्षण नोंदवली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com