esakal | पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी निवासस्थानी केली गणेश मुर्तीची प्रतिष्ठापना
sakal

बोलून बातमी शोधा

पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी निवासस्थानी केली गणेश मुर्तीची स्थापना

राज्यावरील कोरोनाचे संकट लवकरात लवकर दूर होवु दे, राज्यातील जनतेला सुख समृद्धी प्राप्त होऊ दे, अशी प्रार्थना श्री गणेशाच्या चरणी केली.

पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी निवासस्थानी केली गणेश मुर्तीची स्थापना

sakal_logo
By
हेमंत पवार

कऱ्हाड (सातारा): सहकार व पणन मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी त्यांच्या मंगळवार पेठेतील निवासस्थानी कुटुंबियांसमवेत श्री गणेश मुर्तीची प्रतिष्ठापना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साधेपणाने केली. राज्यावरील कोरोनाचे संकट लवकरात लवकर दूर होवु दे, राज्यातील जनतेला सुख समृद्धी प्राप्त होऊ दे, अशी प्रार्थना श्री गणेशाच्या चरणी केली.

हेही वाचा: कऱ्हाड : उपजिल्हा रुग्णालयातील रिक्त पदे भरा- प्रहार संघटना

सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचे संचालक जशराज पाटील, आदरणीय पी.डी. पाटील सहकारी बँकेचे संचालक सागर पाटील, कऱ्हाड पालिकेतील विरोधी पक्षनेते सौरभ पाटील, दिग्विजय पाटील, केयुर पाटील आदी उपस्थित होते.

हेही वाचा: कऱ्हाड: सरपंच परिषदेची कार्यकारिणी जाहीर

सहकारमंत्री पाटील म्हणाले, प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षीही गणेशोत्सव पूर्ण राज्यांमध्ये मोठ्या उत्साहाने साजरा होत आहे. गेल्या वर्षी गणेशोत्सवावर कोरोनाचे संकट मोठ्या प्रमाणावर होते, यावर्षी हे संकट कमी झाले नसून केंद्र सरकारच्या गाईड लाईनच्या माध्यमातून प्रशासनाने काही निर्बंध शिथिल केलेले आहेत. या पार्श्वभूमीवर हा गणेश उत्सव यावर्षी साजरा होत आहे.

हेही वाचा: कऱ्हाड, सांगली, कोकणातून 45 लाखांची दारू जप्त

यानिमित्ताने राज्यातील सर्व जनतेला गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देतो. हा दहा दिवसाचा उत्साही सण आपण सर्वांनी शांततेने धार्मिक भावनेने पार पाडावा, राज्यावर असलेले कोरोनाचे संकट दूर होण्यासाठी श्रींच्या चरणी प्रार्थना करावी, या दहा दिवसांच्या कालावधीमध्ये आपले मित्र मंडळी, कुटुंबीय यांनी कोरोनाच्या बाबतीमध्ये निर्बंध पाळणे आवश्यक आहे. तशाप्रकारे निर्बंध सर्वांनी पाळावे, मास्क वापरावा, सुरक्षित अंतर ठेवावे, स्वच्छता राखावी असे आवाहन मंत्री पाटील यांनी यावेळी केले.

loading image
go to top