Satara News: ‘पत्रकार मारहाणप्रकरणी चौकशीअंती कडक कारवाई’: पालकमंत्री शंभूराज देसाई व पोलिस अधीक्षक तुषार दोशी यांची ग्वाही
Journalist Attack in Satara: कोरेगाव येथील पत्रकार नवनाथ पवार यांना ‘मटक्याची बातमी का लावलीस?’ अशी विचारणा करून त्यांची गाडी अडवून तलाठी प्रशांत पवार याने मारहाण केल्याप्रकरणी कोरेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.
Authorities Assure Fair Probe, Stern Action in Attack on JournalistSakal
कोरेगाव : कोरेगाव येथील पत्रकार नवनाथ तुकाराम पवार यांना तलाठी प्रशांत प्रकाश पवार याने केलेल्या मारहाणीची सखोल चौकशी करून योग्य ती कारवाई करण्याची ग्वाही आज पालकमंत्री शंभूराज देसाई व पोलिस अधीक्षक तुषार दोशी यांनी दिली.