सातारा: आता पावसाने उघडीप दिली असल्याने, महसूलसह कृषी, जिल्हा परिषद, सार्वजनिक बांधकाम अशा सर्वच यंत्रणांनी अतिवृष्टीत नुकसान झालेल्या फिल्डवर जाऊन तत्काळ पंचनामे करावेत. कृषीच्या नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी बांधावर पोचून छायाचित्रे घेत वस्तुनिष्ठ पंचनामे करा. जिल्ह्याच्या पुनर्उभारणीसाठी या नुकसानीचा परिपूर्ण अहवाल शासनास केला जाईल. आवश्यक निधी मिळविण्यासाठी जिल्ह्यातील सर्व मंत्री व लोकप्रतिनिधींना सोबत घेऊन प्रयत्न केले जातील, असे स्पष्ट मत पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी व्यक्त केले.