
सातारा: इनरव्हील क्लब साताराच्या अध्यक्षपदी रूपाली गुजर, तर सचिवपदी ॲड. अरुंधती अयाचित यांची निवड झाली. इनरव्हील क्लब साताराचा नवीन कार्यकारिणीचा पदग्रहण समारंभ नुकताच येथे संपन्न झाला. कार्यक्रमास कन्या शाळेच्या प्राचार्या सुरेखा दौंडे, लोणंदच्या नगरसेविका राजश्री शेळके प्रमुख पाहुण्या, तर पोस्ट डिस्ट्रिक्ट अध्यक्षा गीता मामनिया, माजी अध्यक्षा चंद्रिका उपाध्यय यांची उपस्थिती होती.