

Aslam Shaikh Kidney Transplant Wife Hasina Donates Kidney After Both His Kidneys Fail Inspiring Story of Love and Sacrifice
sakal
-मनोज पवार
दुधेबावी : पती-पत्नीचे नाते हे केवळ सुख-दुःखात सोबत राहण्यापुरते मर्यादित नसते, तर प्रसंगी एकमेकांसाठी स्वतःच्या आयुष्याचीही बाजी लावण्याची ताकद या नात्यात असते. याच प्रेमाची, त्यागाची आणि समर्पणाची प्रचिती तिरकवाडी (ता. फलटण) येथील हसीना अस्लम शेख यांनी दिली आहे. दोन्ही किडन्या निकामी झाल्याने जीवन-मृत्यूच्या संघर्षाला सामोरे जाणाऱ्या आपले पती अस्लम रहमान शेख यांना स्वतःची किडनी दान करून त्यांनी जणू पुनर्जन्मच दिला आहे. त्यांच्या या धाडसी निर्णयामुळे २१व्या शतकात पती-पत्नीच्या नात्यातील विश्वास, प्रेम आणि माणुसकीचा नवा आदर्श समाजासमोर उभा राहिला आहे.