

Satara Accident
Sakal
फलटण: फलटण- पुसेगाव रस्त्यावर वाठार निंबाळकर (ता. फलटण) येथे आज सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास चारचाकी आणि मालट्रकची समोरासमोर धडक झाली. या अपघातात सहा जण जखमी झाले असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रमेश मधुकर काटकर, सौरभ भीमराव पाटील, योगेश तुकाराम पाटील, अभिजित अंबाजी पाटील, पुष्कर घाडगे, योगेश घाडगे (सर्व रा. कोल्हापूर) अशी जखमींची नावे आहेत.