
Villagers pay tribute as the mortal remains of the Karad soldier, who died of a heart attack in Punjab, arrive home.
Sakal
तांबवे : भारतीय सैन्य दलातील मराठा लाइट इन्फंट्रीमध्ये कार्यरत असलेले जवान सोमनाथ शामराव सुर्वे (वय ४७) यांचे पंजाबमधील चंदीगड येथे सेवा बजावताना हृदयविकाराने निधन झाले. ते मूळचे कऱ्हाड तालुक्यातील आबईचीवाडी गावचे सुपुत्र होते. उद्या (शुक्रवार) मूळगावी त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.