

Tragic scene from Satara where a Mahuli woman lost her life after being run over by a tractor-trolley.
sakal
सातारा : बाँबे रेस्टॉरंट परिसरात आज सकाळी झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवरून जाणाऱ्या २६ वर्षीय सारिका सुतार (रा. संगममाहुली) या विवाहित महिलेचा जागीच मृत्यू झाला. ट्रॅक्टर-ट्रॉलीखाली चिरडून झालेल्या या मृत्यूमुळे परिसरातील रस्त्यांची दयनीय अवस्था आणि बेशिस्त वाहतूक व्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.