
Ahead of polls, strong political movement in Satara after Manakumre–Shinde meeting
Sakal
हुमगाव : जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे यांची मुंबईत काल राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांच्यासोबत कमराबंद चर्चा झाल्याचे समजते. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या तोंडावर दोन्ही नेत्यांमध्ये झालेल्या भेटीने जावळी तालुक्यात उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.