

Mahind Dam Spillway Flows at Full Capacity as Heavy Rains Boost Water Storage
sakal
ढेबेवाडी : परिसरात दोन दिवसांपासून पावसाने जोर धरल्याने वांग नदीवरील महिंद प्रकल्प ओव्हरफ्लो झाला आहे. धरणाच्या सांडव्यावरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत आहे. ढेबेवाडीपासून सुमारे दहा किलोमीटरवरील महिंद गावाजवळ बांधलेल्या प्रकल्पाला चांगली नैसर्गिक अनुकूलता लाभली आहे.