
Mayani canal washed away in Khatav after heavy rains, leaving Kharif crops damaged.
esakal
कलेढोण : खटाव पूर्व भागात झालेल्या दोन दिवसांच्या पावसाच्या हजेरीमुळे रस्ते, शेती व बंधाऱ्याचे नुकसान झाले. त्यात मायणी (ता. खटाव) येथील मायणी बायपास रस्त्यास लागून असलेला श्रीनाथ मंदिर ते महादेव मंदिराकडे जाणारा साकव चांद नदीतील जोराच्या पाण्याच्या प्रवाहामुळे अर्धवट वाहून गेला, तर मुळीकवाडी-पाचवड या रस्त्यावरील पुलाला पाण्याच्या प्रवाहामुळे भगदाड पडले, तसेच कलेढोणला पावसामुळे शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले असून, कृषी विभागाकडून नुकसानग्रस्त भागांचा पंचनामा सुरू आहे.