येरळवाडी तलाव काठोकाठ; शेतीसह पिण्याचा पाणीप्रश्‍न मिटणार!

अयाज मुल्ला
Wednesday, 16 September 2020

येरळवाडी तलावातील पाण्याच्या विसर्गामुळे तलावाखालील येरळा नदीचे पात्र प्रवाहित होण्यास मदत होणार आहे. येरळवाडी तलाव पाणलोट क्षेत्रात चौफेर ऊस शेतीचे प्रमाण वाढलेले आहे. तलावातील पाणीपातळी वाढल्याने यंदा थंडीत हजारो फ्लेमिंगो परदेशी पाहुणे मोठ्या प्रमाणात हजेरी लावतील, अशी आशाही पक्षीप्रेमी व्यक्त करत आहेत.

वडूज (जि. सातारा) : येरळवाडी मध्यम प्रकल्प पूर्णक्षमतेने भरला असून सांडव्यावरून पाणी वाहू लागले आहे. सलग तीन वर्षे हा तलाव पूर्णक्षमतेने भरत असून, तालुक्‍यातील जनता आनंदली आहे. तलावाच्या सांडव्यावरून पाणी वाहू लागल्याने तलाव परिसरात मच्छिमारीला उधाण आले आहे. 

तालुक्‍यातील बहुतांशी भागाला येरळवाडी प्रकल्पातून पाणीपुरवठा होतो. या तलावावर मायणी, वडूज, खातवळ, गुरसाळे, नढवळ, येरळवाडी, अंबवडे आदी प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजना अवलंबून आहेत. तलावाशेजारील शेती व बनपुरी फिडिंग पॉइंटलाही येरळवाडीतून पाणीपुरवठा होतो. गेल्या काही आठवड्यांपासून तालुक्‍याच्या पश्‍चिम भागासह तलावाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाने समाधानकारक हजेरी लावल्याने तलावात पाणीसाठ्यात वाढ होऊन हा तलाव पूर्णक्षमतेने भरला आहे. त्यामुळे सांडव्यावरून पाणी वाहू लागले आहे. 

कांदा निर्यातबंदीविरोधात कॉंग्रेसचा आक्रमक पवित्रा; मंत्री जावडेकरांचे घुमजाव!

या तलावातील पाण्याच्या विसर्गामुळे तलावाखालील येरळा नदीचे पात्र प्रवाहित होण्यास मदत होणार आहे. येरळवाडी तलाव पाणलोट क्षेत्रात चौफेर ऊस शेतीचे प्रमाण वाढलेले आहे. तलावातील पाणीपातळी वाढल्याने यंदा थंडीत हजारो फ्लेमिंगो परदेशी पाहुणे मोठ्या प्रमाणात हजेरी लावतील, अशी आशाही पक्षीप्रेमी व्यक्त करत आहेत. पिण्याच्या पाण्याबरोबरीने शेती पाण्याचाही प्रश्न मिटल्याने नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घुमली हलगी; कलाकारांचा सरकारला अल्टिमेटम! 

टंचाईत पिण्यासाठी पाणी  :  येरळवाडी मध्य प्रकल्पाची साठवण क्षमता 32.80 दशलक्ष घनमीटर इतकी आहे. पिण्यासाठी आवश्‍यकतेप्रमाणे वडूज, मायणी, अंबवडे व कातरखटाव या गावांना काही प्रमाणात औद्योगिक प्रयोजनार्थ मंजुरी देण्यात आली आहे. टंचाई कालावधीत स्थानिक स्वराज्य संस्था व महसूल यंत्रणेमार्फत तालुक्‍यातील गावांना टॅंकरद्वारा पिण्यासाठी पाणीपुरवठा केला जात आहे. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Heavy Rain In Khatav Taluka Satara News