सातारा : राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे; पण सरकारकडून शेतकऱ्यांना कोणतीही मदत होताना दिसत नाही. राज्यातील शेतकऱ्यांत प्रचंड अस्वस्थता आहे. निवडणुकीआधी सरसकट कर्जमाफी देऊ अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. त्यामुळे दिवाळी गोड करण्याआधी शेतकऱ्यांच्या दसरा गोड केला, तर आणखी चांगलं होईल, अशी अपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली.