
सातारा: हवामान विभागाने जिल्ह्यात दोन दिवस रेड अलर्टचा इशारा दिल्यानुसार गेल्या दोन ते तीन दिवसांपासून जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत आहे. पाटण, महाबळेश्वर, जावळी, वाई तालुक्यांसह कऱ्हाडला पावसाचा जोर अधिक आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळित झाले आहे. कोयना, धोम, उरमोडी, कण्हेर या प्रमुख धरणांतील पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी विसर्ग सुरू आहे. जिल्ह्यात दोन दिवसांत तब्बल ८३.७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. वाढलेला पावसामुळे नद्यांनी धोक्याची पातळी गाठली असून, घाट क्षेत्रात दरडी कोसळण्याची भीती आहे. त्यामुळे प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.