Khambatki Ghat : खंबाटकी घाटात सहाव्या वळणावर दत्त मंदिराजवळ मोठी वाहतूक कोंडी; मार्गावर वाहनांच्या मोठ्या रांगा

घाटातील वाहतूक ही बोगद्या मार्गे वळवण्यात आली आहे.
Khambatki Ghat
Khambatki Ghatesakal
Summary

महामार्ग पोलीस या ठिकाणी वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न करत आहेत. एवढ्या आठ दिवसांत शिवशाही बंद पडण्याची ही तिसरी वेळ आहे.

खंडाळा : खंबाटकी घाटाच्या (Khambatki Ghat) सहाव्या वळणावर दत्त मंदिराजवळ एक शिवशाही बस (Shivshahi Bus) व ट्रक बंद पडल्याने घाटात वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या आहेत. शिवशाही व ट्रक एकाच वेळी बंद झाल्याने येथे वाहनांना पुढे सरकायला रस्ताच नाही.

परिणामी, घाटातील वाहतूक ही बोगद्या मार्गे वळवण्यात आली आहे. सध्या या मार्गावर वाहनांची प्रचंड कोंडी असून सातारा बाजूला जाण्यासाठी वाहनांच्या रांगा पाहिला मिळत आहेत.

Khambatki Ghat
Sangli Lok Sabha Result : वसंतदादांच्या नातवाला डावललं गेलं, षड्‌यंत्र रचलं गेलं; पण तरीही 'डबल करंट'ने जिंकला डाव!

तर, महामार्ग पोलीस या ठिकाणी वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न करत आहेत. एवढ्या आठ दिवसांत शिवशाही बंद पडण्याची ही तिसरी वेळ आहे. परिणामी, वारंवार घाट जाम होत आहे. आज रविवार असल्याने वाहनांची संख्या ही जास्त आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com