

Project-affected families set to benefit from new rehabilitation rules granting independent rights to heirs.
sakal
सातारा : राज्यातील प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसन प्रक्रियेत दीर्घकाळ भेडसावणाऱ्या अन्यायकारक अडचणींना अखेर पूर्णविराम मिळणार आहे. मूळ जमीनधारकांच्या मृत्यूनंतर त्यांच्या वारसांना स्वतंत्र हक्काने पुनर्वसन लाभ मिळावा, यासाठी महाराष्ट्र शासनाने मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. मदत व पुनर्वसनमंत्री मकरंद पाटील यांच्या पुढाकारातून झालेल्या या निर्णयामुळे राज्यातील हजारो प्रकल्पग्रस्त कुटुंबांना मोठा दिलासा मिळणार आहे.