Farming Success Story:'निसर्गाशी दोन हात करत शेतकऱ्यांनी घेतले डाळिंबाचे उत्पादन'; किलोला दोनशे रुपये दर; माण तालुक्यात क्षेत्र वाढले..

Man Taluka Agriculture: माण तालुक्यातील कोरडवाहू परिस्थिती, अनियमित पाऊस आणि हवामानातील सततचे बदल—या सगळ्यांशी झुंज देत शेतकरी रामभाऊ जाधव यंदा पुन्हा डाळिंबाच्या बागेत उभे होते. मागील दोन वर्षांचा अनुभव त्रासदायक होता; कधी गारपीट, तर कधी कोरडी हवा पिकावर घाव घालत होती.
Pomegranate Boom in Man Taluka as Farmers Overcome Harsh Weather Challenges

Pomegranate Boom in Man Taluka as Farmers Overcome Harsh Weather Challenges

Sakal

Updated on

-शाल गुंजवटे

बिजवडी : निसर्गाच्या लहरीपणामुळे ऐन उन्हाळ्यातील मे महिन्यात सुरू झालेल्या पावसाने ऑक्टोबर महिन्यापर्यंत मुक्काम ठोकत शेतकऱ्यांची झोप उडवली. कांदा शेतातच नासून गेल्याने रोटर फिरवावा लागला. मात्र, निसर्गाशी दोन हात करत डाळिंब लागवड केलेल्या शेतकऱ्यांनी बहार यशस्वी करून दाखवले.

त्यातच डाळिंबाचे दर किलोला सरासरी शंभर ते २०० रुपयापर्यंत राहिले. त्यामुळे माण तालुक्यातील मार्डी, दहिवडी, बिदाल, बिजवडी, मोही, शिंगणापूर, भालवडी, खुटबाव व परिसरातील डाळिंब लागवडधारक शेतकऱ्यांत उत्साहाचे वातावरण आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com