साताऱ्यात रविवारी हिल हाफ मॅरेथॉन स्पर्धा; वाहतुकीत बदल

मॅरेथॉनसाठी शहरासह परिसरातील वाहतुकीत तात्‍पुरते बदल करण्‍यात येणार
साताऱ्यात रविवारी हिल हाफ मॅरेथॉन स्पर्धा; वाहतुकीत बदल
साताऱ्यात रविवारी हिल हाफ मॅरेथॉन स्पर्धा; वाहतुकीत बदल sakal

सातारा : देशासह परदेशात नावलौकिक असणारी सातारा येथील हिल मॅरेथॉन रविवारी (ता. १२) सकाळी सहा ते दहा या वेळेत होत आहे. या मॅरेथॉनसाठी दर वर्षी शेकडो धावपट्टू येतात. या मॅरेथॉनसाठी शहरासह परिसरातील वाहतुकीत तात्‍पुरते बदल करण्‍यात येणार असून, या काळात नागरिकांनी सहकार्य करण्‍याचे आवाहन सातारा पोलिस दलाने केले आहे.

पोलिस परेड ग्राउंड येथून सुरू होणारी ही मॅरेथॉन पोवई नाका, अदालतवाडा, समर्थ मंदिर चौक, बोगदा परिसर, यवतेश्‍‍वर घाटातून जाते व त्‍याच मार्गे पुन्‍हा पोलिस परेड ग्राउंडवर परतते. या मॅरेथॉनमध्‍ये सहभागी होणाऱ्या धावपट्टूंना प्रोत्‍साहन देण्‍यासाठी मॅरेथॉन मार्गावर सातारकर मोठी गर्दी करत असतात. यंदा ही मॅरेथॉन रविवारी होत आहे. यानिमित्ताने शहरातील वाहतुकीत बदल करण्‍यात आले आहेत. या मॅरेथॉनमध्‍ये सहभागी होण्‍यासाठी येणाऱ्या स्‍पर्धकांच्‍या वाहनांसाठी कलेक्‍टर ऑफिससमोरील रस्‍ता, प्रशासकीय इमारतीचे मैदान, जिल्‍हा परिषद मैदान, जुना आरटीओ ऑफिस परिसर, करंजे रोडवर पार्किंग व्‍यवस्‍था करण्‍यात आली आहे.

साताऱ्यात रविवारी हिल हाफ मॅरेथॉन स्पर्धा; वाहतुकीत बदल
दागिने चोरीप्रकरणी तीन अट्टल चोरांना अटक; पोलिसांनी आवळल्या मुसक्या

या मार्गावर वाहन बंदी...

पोलिस परेड ग्राउंडपासून सुरू होणारी मॅरेथॉन, पोवई नाका, अदालतवाडा, समर्थ मंदिर, बोगदा परिसरातून यवतेश्‍‍वर घाटाकडे जाणार असल्‍याने या मार्गावर सर्व प्रकारच्‍या वाहनांना प्रवेशास मनाई करण्‍यात आली आहे. आपत्कालीन परिस्‍थितीत रुग्‍णवाहिका, पोलिस दलाची वाहने, अग्‍निशामक दलांना या मार्गावर प्रवेश करता येणार आहे.

येथील वाहतुकीत बदल

शिवराज पंपाकडून येणारी वाहने ग्रेड सेपरेटमधून बस स्‍थानक परिसरात जातील. बाँबे रेस्टॉरंटकडून येणारी वाहने जिल्‍हा परिषद चौक, कनिष्‍क मंगल कार्यालय, रिमांड होममार्गे इतरत्र जातील. बस स्‍थानकाकडून येणारी वाहने ग्रेड सेपरेटरमधून बाँबे रेस्‍टॉरंट, शिवराज पंपाकडे जातील. सज्‍जनगड, ठोसेघर, परळीकडून येणारी वाहने खिंडवाडीमार्गे इतरत्र जातील. कास बाजूकडून येणाऱ्या वाहनांना यवतेश्वर मार्गे साताऱ्याकडे येता येणार नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com