
-राजेश पाटील
ढेबेवाडी : पावसाळ्याच्या मध्यावर फुलणाऱ्या रंगीबेरंगी फुलांनी परिसरातील डोंगररांगा, पठारे बहरली आहेत. फुलांचे हे गालिचे जणू ‘कास’चा ‘भास’ करून देत असले, तरीही पर्यटकांच्या नजरेतून मात्र वर्षानुवर्षे ही फुलांची ठिकाणे दुर्लक्षितच आहेत. साधारणपणे चाळीस- पन्नास किलोमीटर अंतरातील ठिकाणे एकमेकांना जोडल्यास पर्यटकांना नेत्रसुखद अनुभव तर मिळेलच. शिवाय अनेक गावे व वाड्या वस्त्यांसाठीही चांगल्या पद्धतीने रोजगार निर्मितीही होऊ शकेल.