
Banwadi Sets Example of Unity as Dargah Sandal Joins Navratri Rally
Sakal
सातारारोड : बनवडी (ता. कोरेगाव) येथे हजरत पीर दस्तगीर दर्ग्याची संदल मिरवणूक आणि गावातील सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळाच्या मिरवणुकीच्या झालेल्या भेटीच्या प्रसंगातून तमाम बनवडीकरांनी सामाजिक ऐक्य व धार्मिक सलोखा जपण्याचा आदर्श निर्माण केला. वाठार स्टेशन पोलिस व सहाय्यक पोलिस निरीक्षक अविनाश माने यांनी पुढाकार घेऊन केलेल्या प्रयत्नांना मिळालेले हे यश आहे. दरम्यान, आज चंदन-वंदन येथे झालेल्या उरसाला राज्याच्या विविध भागातून आलेल्या भाविकांची मोठी गर्दी झाली होती.