

Major Theft in Shindewadi Village; Police Launch Investigation After Daytime Break-In
sakal
पाचगणी : तालुक्यातील शिंदेवाडी (पो. दापवडी) येथे भरदिवसा बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी सोन्याचे दागिने आणि रोकड असा एकूण दोन लाख ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची धक्कादायक घटना काल घडली आहे. याप्रकरणी मेढा पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.