
शिक्रापूर: कृष्णानगर येथे सकाळी फिरावयास गेलेल्या महिलांना कोयत्याचा धाक दाखवत लुटणाऱ्या लखन पोपट भोसले (वय ३२, रा. जयरामस्वामी-वडगाव, ता. खटाव) या सराईत गुन्हेगाराने शिक्रापूर (जि. पुणे) येथे शनिवारी सायंकाळी सातारा पोलिसांच्या पथकावर चाकू हल्ला केला. त्यावेळी स्वसंरक्षणार्थ कारवाईत पोलिसांची गोळी लागल्याने लखन भोसलेचा मृत्यू झाला. लखन भोसले हा सराईत गुन्हेगार असून, त्याच्यावर जबरी चोरीसह इतर २२ गंभीर गुन्ह्यांची नोंद साताऱ्यासह परजिल्ह्यातील पोलिस ठाण्यांत आहे. त्याच्यावर मोकांतर्गत देखील कारवाई करण्यात आली होती.