
महाबळेश्वर : तापोळा येथे फिरायला आलेल्या चार मित्रांपैकी एकाचा काल (शनिवार) रात्री दहाच्या दरम्यान दहा फूट उंच शेताच्या बांधावरून पडून जागीच मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली. दत्तात्रय सर्जेराव रांजणे (वय ५०, रा. कोलेवाडी, ता. जावळी, जि. सातारा) असे त्यांचे नाव आहे. महाबळेश्वर पोलिस ठाण्यात या घटनेची आकस्मिक मृत्यू अशी नोंद करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे.