

Deadly Curve Claims Young Engineer’s Life During Weekend Road Trip to Ganpatipule
sakal
मसूर: सुटीचा दिवस असल्याने गणपतीपुळे येथे देवदर्शनासाठी निघालेल्या तीन तरुण अभियंता मित्रांच्या मोटारीला कऱ्हाड तालुक्यातील वडोली भिकेश्वर गावाजवळ (कवठे फाटा) शनिवारी मध्यरात्री पाऊणच्या सुमारास भीषण अपघात झाला. तीव्र वळणावर भरधाव मोटार नियंत्रणाबाहेर गेल्याने विरुद्ध बाजूला जाऊन ती ३०० फूट खोल खड्ड्यात उलटली. या भीषण अपघातात मोटार चालकाचा जागीच मृत्यू झाला, तर एक जण गंभीर आणि दुसरा किरकोळ जखमी झाला.