
-हेमंत पवार
कऱ्हाड: सणा-सुदीला, विविध उत्सवांत सजावटीसाठी बाजारात येणाऱ्या प्लॅस्टिक फुलांमुळे शेतकऱ्यांचे नुकसान होते. त्यामुळे कृत्रिम फुले बंद व्हावीत व फूल उत्पादक शेतकऱ्यांना योग्य भाव मिळावा, अशी मागणी विधानसभेत आमदारांनी केली होती. त्यानंतर फूल उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी प्लॅस्टिक-कृत्रिम फुलांवर बंदी घालण्यात येईल, अशी घोषणा फलोत्पादनमंत्री भरत गोगावले यांनी महिन्यापूर्वी केली होती. सध्या गणेशोत्सवामध्ये बाजारपेठेत राजरोसपणे कृत्रिम फुलांची विक्री सुरू आहे. त्यासंदर्भातील अध्यादेशच सरकारने काढला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांतून नाराजी व्यक्त होत आहे.