
कऱ्हाड : राहत्या घराचा दरवाजाचा कडी-कोयंडा अज्ञाताने तोडून घरात प्रवेश करून दोन लाखांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना येथील वाखाणत रुक्मिणी गार्डन भागात घडली. काल रात्री ते आज पहाटेच्या दरम्यान हा प्रकार झाला. योगेश वसंतराव महाडिक (वय ४३, रा. रुक्मिणी गार्डन, कऱ्हाड) यांनी शहर पोलिसात त्याबाबत फिर्याद दिली.