मालदनला पावसामुळे घरांची पडझड; सुदैवाने दुर्घटना टळली!

राजेश पाटील
Saturday, 17 October 2020

पाटण परिसरात दोन दिवसांपासून पावसाची रिपरिप असून, शिवारात मोठ्या प्रमाणात पाणी साचून राहिले आहे. ओलीमुळे जुन्या कुमकुवत घरांनाही धोका पोचत असून, भिंतींच्या पडझडीचे सत्र पुन्हा सुरू झाले आहे. मालदन येथील घार्गेवस्तीतील शंकर धोंडी घारगे यांच्या मोठ्या घराची भिंत अचानक कोसळली. रस्त्याच्या बाजूला भिंत पडल्याने सुदैवाने ते बचावले.

ढेबेवाडी (जि. सातारा) : मालदन (ता. पाटण) येथील घराची भिंत कोसळल्याने मोठे नुकसान झाले. भिंतीचे दगड पडून एका दुचाकीचेही किरकोळ नुकसान झाले आहे. काल सायंकाळी ही घटना घडली. पावसामुळे तेथे लोकांची वर्दळ नसल्याने सुदैवाने जीवितहानी टळली आहे. 

परिसरात दोन दिवसांपासून पावसाची रिपरिप असून, शिवारात मोठ्या प्रमाणात पाणी साचून राहिले आहे. ओलीमुळे जुन्या कुमकुवत घरांनाही धोका पोचत असून, भिंतींच्या पडझडीचे सत्र पुन्हा सुरू झाले आहे. मालदन येथील घार्गेवस्तीतील शंकर धोंडी घारगे यांच्या मोठ्या घराची भिंत काल सायंकाळी साडेपाचच्या सुमारास अचानक कोसळली. श्री.घारगे यांचे घर रस्त्यानजीकच आहे. लहान मुले आणि नागरिकांची तेथून सतत ये-जा असते. घटना घडली त्यावेळी घारगे कुटुंबीय घरात होते. रस्त्याच्या बाजूला भिंत पडल्याने सुदैवाने ते बचावले. 

कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना कावीळ, जगच दिसू लागलंय पिवळं : नगराध्यक्षांचा सडेतोड पलटवार

पाऊस सुरू असल्याने घराच्या परिसरात वर्दळ नसल्याने मोठी दुर्घटना टळल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. घराजवळ उभ्या केलेल्या एका दुचाकीवर भिंतीचे दगड पडल्याने किरकोळ नुकसान झाल्याचे सांगण्यात आले. मंडलाधिकारी ए. एल. संकपाळ यांच्या मार्गदर्शनाखाली तलाठी बी. आर. पाटील, कोतवाल दीपक इंगवले यांनी नुकसानीचा पंचनामा केला. सुमारे 50 हजारांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. संपूर्ण घरच खिळखिळे झाल्याने राहण्यास असुरक्षित बनल्याचे घारगे कुटुंबीयांनी सांगितले. शासनाकडून तातडीने भरीव भरपाई मिळावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The House Collapsed Due To Rain In Patan Area Satara News