esakal | Satara Rain : छप्पर अंगावर कोसळून कोंढावळ्यात वृद्धाचा मृत्यू
sakal

बोलून बातमी शोधा

Kondhavale

कोंढावळे गावच्या पूर्व दिशेस 'सुतारकी' शिवारात ओढ्याच्या कडेला सहा कातकरी कुटुंबे कुडा-मेढीच्या झोपड्या बांधून राहतात.

Satara Rain : छप्पर अंगावर कोसळून कोंढावळ्यात वृद्धाचा मृत्यू

sakal_logo
By
भद्रेश भाटे

पसरणी (सातारा) : जोरदार वादळी वारे व मुसळधार पावसात (Heavy Rain) अंगावर घराचे छप्पर कोसळल्याने कोंढावळे (ता. वाई) येथील कातकरी वस्तीतील वामन जाधव (वय ६५) यांचा झोपेत असतानाच जागीच मृत्यू झाला. कोंढावळे गावच्या पूर्व दिशेस 'सुतारकी' शिवारात ओढ्याच्या कडेला सहा कातकरी कुटुंबे कुडा-मेढीच्या झोपड्या बांधून राहतात. यांपैकी एका छपरात मंगळवारी रात्री वामन जाधव एकटेच झोपले होते. त्यांची मुले-सुना शेजारच्या झोपडीत झोपले होते. (House Collapsed Due To Rain And One Died In Kondhavale bam92)

काल दुपारपासून वेगवान वाऱ्यासह पावसाचा जोर वाढला आहे. संततधार पाऊस व जोरदार वाऱ्यामुळे मध्यरात्रीच्या सुमारास झोपेत असताना अंगावर झोपडीचे छप्पर कोसळल्याने जाधव यांचा छपराच्या ओझ्याखाली दबून जागीच मृत्यू झाला. सकाळी वडील झोपलेली झोपडी जमीनदोस्त झाल्याचे पाहून मुलगा व सून यांनी वामन यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असता ते सापडले नाहीत. त्यामुळे त्यांनी छपराचा कोसळलेला भाग उचकटून पाहिल्यावर वामन जाधव त्याखाली मृतावस्थेत आढळले. त्यांच्या निधनाबद्दल कोंढावळे, वासोळे गावांत हळहळ व्यक्त होत आहे.

House Collapsed Due To Rain And One Died In Kondhavale bam92

loading image