
भुईंज: ओझर्डे (ता. वाई) येथे अज्ञात चोरट्यांनी रात्री लोखंडी गजाच्या साह्याने घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश करत चोरी करण्याचा प्रयत्न केला; परंतु हाती काहीच लागले नसल्याने शेजारील घरासमोरील पितळेचा बंब चोरट्यांनी लंपास केला आहे. याप्रकरणी अज्ञात चोरट्यावर भुईंज पोलिसात गुन्हा नोंद झाला आहे.