Satara Hill Marathon 2025: निसर्ग सानिध्‍यात उत्‍सव धावण्‍याचा! 'जेबीजी सातारा हिल हाफ मॅरेथॉनला उदंड प्रतिसाद'; धावपटूंच्‍या सहभागाने नवा ऊर्जासंचार

JBG half marathon India running festival: पोलिस कवायत मैदानापासून सुरू झालेली मॅरेथॉन पारंगे चौक, पोवई नाका, शाहू चौकमार्गे, अदालत वाडा, समर्थ मंदिर चौक, पॉवर हाऊस, यवतेश्वर घाटातून प्रकृती आयुर्वेदिक हेल्थ रिसॉर्टच्या ५०० मीटर पुढे जाऊन त्याच मार्गाने परत येऊन पोलिस कवायत मैदानावर मोठ्या जल्लोषात संपली.
Runners enjoy the thrill of JBG Satara Hill Half Marathon 2025 amidst scenic hills.

Runners enjoy the thrill of JBG Satara Hill Half Marathon 2025 amidst scenic hills.

Sakal

Updated on

सातारा: आल्‍हाददायक पहाट अन्‌ डोंगररांगेतील घाटरस्त्यावर पसरलेल्‍या हलक्‍याशा धुक्‍यातून थंड वाऱ्याचा झुळका अंगावर घेत, पावले पुढे टाकणाऱ्या धावपटूंचा जोश असे दृश्य आज १४ व्या जेबीजी सातारा हिल हाफ मॅरेथॉनच्या निमित्ताने अनुभवायला मिळाले. सातारा रनर्स फाउंडेशनच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही या मॅरेथॉनने देशातील हजारो धावपटूंना आणि नागरिकांना एकत्र आणले. एवढेच नव्‍हे तर शहरात मॅरेथॉनच्या निमित्ताने आज एक वेगळीच ऊर्जाही निर्माण झाली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com