
गोंदवले: बाजरीच्या शेकडो भाकऱ्यांची चवड, कित्येक किलोचा झुणका आणि वाढप्यांची उत्साहपूर्ण लगबग श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या दिंडीत पाहायला मिळाली. आपल्या जोगव्यातून मिळणाऱ्या दानातून तृतीयपंथी रवी ऊर्फ सरस्वती यांनी वारकऱ्यांसाठी झुणका भाकरीचा खास बेत करून ही अनोखी सेवा केलीय.