
"Helping the Helpless: ₹15 Lakh Support Given to 110 Patients in One Year"
Sakal
-सिद्धार्थ लाटकर
सातारा: भुकेले, दीनदलित, गरजू रुग्ण, असाह्य लोकांना लाखो रुपयांचा हातभार लावत सातारा जिल्हा बैतूलमाल कमिटीने माणुसकीचे दर्शन घडविले आहे. सन २०२१ पासून समाजात सुरू असलेला हा मदतीचा यज्ञ अखंड सुरू आहे. या कमिटीने वंचितांच्या दैनंदिन गरजा भागविताना वर्षभरात सुमारे ११० रुग्णसेवेच्या माध्यमातून १५ लाख ३० हजार रुपयांची मदत करून त्यांचे भावी आयुष्य सुखकर केले आहे.