चारित्र्याच्या संशयावरून पतीकडून पत्नीचा खून; डोक्यात मारली लोखंडी पार I Crime News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Koregaon Taluka

चारित्र्याच्या संशयावरुन बाबूनं पत्नी वैशाली हिला लोखंडी पहारीनं मारहाण केलीय.

चारित्र्याच्या संशयावरून पतीकडून पत्नीचा खून; डोक्यात मारली लोखंडी पार

रहिमतपूर (सातारा) : सातारा जिल्ह्यात (Satara District) चारित्र्याच्या संशयावरून खून झाल्याच्या घटना वाढत असतानाच आता आणखी एक प्रकरण समोर आलंय. कोरेगाव तालुक्यातील (Koregaon Taluka) नागझरीत मोलमजुरी करणाऱ्या पतीनं चारित्र्याच्या संशयावरून पत्नीच्या डोक्यात लोखंडी पार मारून खून केलाय. या घटनेनं नागझरीसह परिसरात एकच खळबळ उडालीय.

वैशाली बाबू जाधव (वय ३५) असं मृत पत्नीचं नाव आहे. बाबू बापू जाधव (४२, मूळ रा. सातारा, सध्या रा. नागझरी, ता. कोरेगाव) असं संशयित आरोपीचं नाव आहे. घटनास्थळावरुन मिळालेल्या माहितीनुसार, साताऱ्यातील असलेला बाबू जाधव हा मोलमजुरीच्या कामासाठी काही महिन्यांपूर्वी पत्नी व पाच मुलांसह नागझरी इथं आला. गावात मिळेल ते काम करुन ते कुटुंब उदरनिर्वाह चालवत होते.

हेही वाचा: Indian Army : जवान प्रथमेश पवार यांना साश्रू नयनांनी अखेरचा निरोप

आज, सोमवारी सकाळी सुमारे साडेदहा वाजण्याच्या सुमारास चारित्र्याच्या संशयावरुन बाबू जाधव याने पत्नी वैशाली हिला लोखंडी पहारीने मारहाण केली. पहारीचा डोक्यात बसलेल्या ठोक्यामुळं वैशाली हिचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, बाबू यानं स्वत:लाही मारहाण करून घेतल्याची चर्चा असून तोही जखमी झाला असल्यानं त्याला उपचारासाठी सातारा शासकीय जिल्हा रुग्णालयात (Satara Government District Hospital) दाखल करण्यात आलंय. या घटनेची माहिती मिळताच रहिमतपूर पोलिस ठाण्याचे (Rahimatpur Police Station) सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश कड यांच्यासह पथक घटनास्थळी दाखल झाले.

Web Title: Husband Murders Wife In Koregaon Taluka

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :SataraCrime News
go to top