esakal | आयएएस डॉ. अश्विनी वाकडेंच्या भावाला 'ती' गाेष्ट खटकली हाेती
sakal

बोलून बातमी शोधा

आयएएस डॉ. अश्विनी वाकडेंच्या भावाला 'ती' गाेष्ट खटकली हाेती

माझ्या यशाचे श्रेय माझे आई-वडील, भाऊ-बहीण यांना जाते. तरुण-तरुणींनी अपयशाने खचून न जाता कठोर परिश्रम घेऊन एकाग्र चित्ताने अभ्यास केल्यास स्वप्न सत्यात उतरून हमखास यश मिळतेच, हे मी सिद्ध करून दाखवले आहे असे डॉ. अश्विनी वाकडे यांनी नमूद केले.

आयएएस डॉ. अश्विनी वाकडेंच्या भावाला 'ती' गाेष्ट खटकली हाेती

sakal_logo
By
हेमंत पवार

कऱ्हाड : डॉ. अश्विनी तानाजी वाकडे यांनी 2019 च्या केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत घेतलेल्या परीक्षेमध्ये यश पटकावून त्या 200 व्या रॅंकने पास झाल्या आहेत. एमबीबीएस होऊनही मोठा भाऊ आणि बहीण हे वर्ग एकचे अधिकारी असल्याने केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा देऊन जिल्हाधिकारी होण्याचे स्वप्न त्यांनी सत्यात उतरून दाखवले आहे.
सातारा जिल्ह्यातील कारसेवकांना अश्रू अनावर 
 
डॉ. अश्विनी यांचे मूळ गाव धनगरवाडी (ता. माढा, जि. सोलापूर) आहे. लहानपणापासूनच त्या जिद्दी आहेत. त्यांचे वडील तानाजी वाकडे हे सेवानिवृत्त सहायक फौजदार असून, आई कल्पना गृहिणी आहेत. त्यांचे ज्येष्ठ बंधू अमरदीप वाकडे हे कऱ्हाड येथे तहसीलदार म्हणून कार्यरत असून, त्यांच्या बहीण मीनाक्षी ठोके या लातूर येथे वित्त विभागामध्ये सहायक संचालक म्हणून कार्यरत आहेत. त्यांचा धाकटा भाऊ शिक्षण घेत आहे. डॉ. अश्विनी यांचे प्राथमिक शिक्षण घेरडी (ता. सांगोला) येथे झाले असून, त्यांची सहावीमध्ये जवाहर नवोदय विद्यालयात निवड झाली होती.

ती निराश झाली नाही... बनवल्या चक्क 400 गणेशमूर्ती  

त्यानंतर बार्शी येथून 12 वीची परीक्षा चांगल्या मार्कांनी उत्तीर्ण होऊन पहिल्याच प्रयत्नांमध्ये त्यांनी बीजे मेडिकल कॉलेज पुणे येथे प्रवेश घेऊन एमबीबीएसची पदवी पटकावली. त्यांचा मोठा भाऊ आणि बहीण हे राज्य लोकसेवा आयोगामार्फत वर्ग एकचे अधिकारी असल्याने केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा देऊन जिल्हाधिकारी होण्याचे स्वप्न त्यांनी बाळगले होते. त्यासाठी त्यांनी एमबीबीएसला असल्यापासून तयारी सुरू केली होती. एमबीबीएस झाल्यावर त्यांनी जिद्दीने आयएएस अधिकारी होण्याचे स्वप्न सत्यात उतरण्यासाठी वाटचाल सुरू केली. त्यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी त्यांनी पुणे येथे सुरू केली. त्यांनी दिवसरात्र अभ्यास करून बहीण-भावांचे मार्गदर्शन घेऊन लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली. त्या परिश्रमाचे फळ म्हणून त्यांना केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत घेतलेल्या परीक्षेमध्ये देशात 200 वी रॅंक पटकावता आली. 

जिल्हाधिकाऱ्यांनी 'या' निर्णयाचा तातडीने फेरविचार करावा; सातारकरांची आग्रही मागणी

धोंडी धोंडी पाऊस दे, पैशाला पावली विकू दे!, गावोगावी घातले जातेय पावसाला साकडे 

तहसीलदार भावाची अशीही जिद्द 

राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा अमरदीप वाकडे आणि मीनाक्षी ठोके या बहीण-भावांनी एकाच वर्षी दिली. त्यामध्ये मीनाक्षी यांना यश मिळाले आणि त्या वित्त विभागामध्ये सहायक संचालक म्हणून पास झाल्या, तर अमरदीप यांना अपयश आले. त्यामुळे मीनाक्षी यांना वाईट वाटल्याने यश मिळूनही त्यांना रडू कोसळले. ही घटना अमरदीप यांना खटकल्याने त्यांनी अधिकारी होण्याचा निर्धार केला. त्यानंतर दिलेल्या परीक्षेत ते पोलिस उपनिरीक्षक म्हणून राज्यात दहावे आले. त्यानंतर 2012 मध्ये ते तहसीलदार म्हणून रुजू झाले. त्यांनी बहिणीची इच्छा निर्धाराने पूर्ण केली. 


माझ्या यशाचे श्रेय माझे आई-वडील, भाऊ-बहीण यांना जाते. तरुण-तरुणींनी अपयशाने खचून न जाता कठोर परिश्रम घेऊन एकाग्र चित्ताने अभ्यास केल्यास स्वप्न सत्यात उतरून हमखास यश मिळतेच, हे मी सिद्ध करून दाखवले आहे. 

- डॉ. अश्विनी वाकडे

Edited By : Siddharth Latkar

loading image
go to top