esakal | कऱ्हाडला तराफ्यावरुन गणेशमुर्तींचे विसर्जन
sakal

बोलून बातमी शोधा

कऱ्हाडला तराफ्यावरुन गणेशमुर्तींचे विसर्जन

कऱ्हाडला तराफ्यावरुन गणेशमुर्तींचे विसर्जन

sakal_logo
By
हेमंत पवार

कऱ्हाड: गणेशमुर्तींच्या विसर्जनासाठी कऱ्हाड (जि.सातारा) येथील पालिका व पोलीस प्रशासनाने जोरदार तयारी केली आहे. दीड दिवसांच्या गणेशमुर्तीचे शनिवारी कृष्णा नदीत विसर्जन झाले. दरम्यान एकावेळी जादा मुर्तींचे विसर्जन नदीच्या मध्यभागी विधीवत करता यावे यासाठी यंदा तराफ्याची संकल्पना राबवण्यात आली आहे. त्याव्दारे आज दीड दिवसांच्या मुर्तींचे विसर्जन कृष्णा नदीपात्रात करण्यात आले.

हेही वाचा: सातारा: जनावरं चारण्‍यास मनाई केल्याने वनमजुरास मारहाण

कोरोनाच्या पार्श्वभुमीवर यंदा नियमांचे पालन करुन गणेशोत्सव साजरा होत आहे. मागील वर्षापेक्षा यंदा नियमात शिथीलता आली असली तरी प्रशासनाने काही निर्बंध घालुन दिले आहेत. त्याचे पालन करुन यंदा उत्साहाला आवार घालत उत्सव साजरा होत आहे. गणेशोत्सव मंडळांनीही कोरोनाचे भान ठेवुन स्वतःहुन उत्साहावर मर्यादा घालुन घेवुन बहुतांश ठिकाणी मंदिरात, खासगी जागेत मुर्तींची प्रतिष्ठापना केली आहे.

दरम्यान पालिकेमार्फत यंदा फिरत्या मुर्ती संकलनाची संकल्पना राबवली आहे. त्यासाठी १४ वॉर्डात फिरती पथके आहेत. त्याशिवाय शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी २१ कृत्रीम तलावांची सोय करण्यात आली आहे. दोन मोठी शेततळीही करण्यात आली आहेत. त्यासाठी पालिकेचे कर्मचारी कार्यत आहेत. यंदा एकावेळी जादा मुर्तींचे विसर्जन कृष्णा नदीच्या मध्यभागी विधीवत करता यावे यासाठी तराफ्याची संकल्पना राबवण्यात आली आहे.

त्याचा पहिला प्रयोग आज रात्री पोलिस उपाधिक्षक रणजीत पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील, पालिकेचे मुख्याधिकारी रमाकांत डाके, जनशक्तीचे गटनेते राजेंद्र यादव, आरोग्य सभापती विजय वाटेगावकर, नगरसेवक जयंत बेडेकर, अख्तर आंबेकरी, मुख्य नगर अभियंता एम. एच. पाटील, सहायक पोलिस निरीक्षक सरोजिनी पाटील, पोलिस उपनिरीक्षक बी. एस. पाटील यांच्यासह अधिकारी कर्मचारी, अग्निशमन दलाचे कर्मचारी यांच्या उपस्थितीत दीड दिवसांच्या गणेशमुर्ती विधीवत पुजन करुन विसर्जन करण्यात आले. दरम्यान यापुढील मुर्तींचे विसर्जन तराफ्यावरुनच करण्यात येणार आहे. त्यामुळे चांगली सोय होणार आहे.

loading image
go to top