

Karad Crime
कऱ्हाड: सैदापूर - विद्यानगर परिसरात आज सकाळी अनोळखी व्यक्तीने स्वतःला पोलिस असल्याचे भासवून एका सेवानिवृत्त व्यक्तीची हातचलाखीने सोन्याची चेन लंपास केली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पांडुरंग किसन इंगळे (वय ६६, सैदापूर, ता. कऱ्हाड) यांनी तक्रार दिली असून, सीसीटीव्हीद्वारे शोधमोहीम हाती घेतल्याची माहिती शहर पोलिसांनी दिली.