'माणुसकी'चे श्राद्ध! तांबवेच्या पाटील कुटुंबाने दिले मुलांना शैक्षणिक साहित्य

तेराव्या दिवशीचा उत्तर कार्याचा विधी उरकून पाटील कुटुंबाने वसतिगृहातील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य भेट दिलं.
Patil Family Helped Jijau Vastigruh Kole
Patil Family Helped Jijau Vastigruh KoleSakal
Updated on

कुटुंबातील कर्तबगार व्यक्तिच्या निधनाचे अतिव दुःख असतानाही त्यांचा विचारांचा, कृतीचा वारसा जोपासत पाटील कुटुंबीयांनी निराधार मुलांना शैक्षणिक साहित्य, भोजन देऊन खऱ्या अर्थाने तेराव्याला 'माणुसकी'चे श्राद्ध घातले. तेराव्या दिवशीचा उत्तर कार्याचा विधी उरकून वडीलांच्या संस्कारांवर चालण्याचा केलेला प्रयत्न आदर्शवत आहे.

तांबवे, ता. कराड, जि.सातारा येथील ज्ञानदेव पाटील यांचे अल्पशा आजाराने नुकतेच निधन झाले. त्यांचा उत्तर कार्य विधी गुरुवारी झाला. त्यानंतर त्यांची मुले विकास पाटील, पत्रकार विशाल पाटील, स्व. सौ. सुशीला ज्ञानदेव पाटील बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा नयना खबाले- पाटील यांनी कोळे, ता. कराड येथील जिजाऊ बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या जिजाऊ वसतिगृहातील 30 निराधार मुलांना वही, पेन, कंपास पेटी आदी शैक्षणिक साहित्य तसेच पाणी बॉटल, टॉवेल याची मदत दिली. शिवाय, या मुलांना भोजनही दिले. यावेळी कराड येथील व्यापारी निखिल शहा, पोतले गावचे सरपंच संदीप पाटील, तांबव्याचे माजी सरपंच जावेद मुल्ला, शंकर चव्हाण, विकास पाटील, अनिल काटवटे, विकास खडंग, आक्काताई पाटील, नयना खबाले, सविता पाटील, प्रियंका पाटील, अस्मिता पाटील, शरयू शेळके, श्रीमान पाटील, अन्वीती खबाले आदी उपस्थित होते. वसतिगृहाचे संस्थापक समीर नदाफ, सलमा नदाफ यांचा पोशाख देऊन सत्कार केला. (In memory of father,family from Tambwe presented educational material to student)

Patil Family Helped Jijau Vastigruh Kole
वसतिगृह शुल्कात कपात करावी

निखिल शहा म्हणाले, आई-वडीलांच्या शिकवणीतून कष्ट, जिद्द, चिकाटी आणि सामाजिक बांधिलकी या गुणांचे बाळकडू मिळालेल्या पाटील कुटुंबीयांनी वडीलांच्या उत्तरकार्य विधी निमित्ताने मुलांना शैक्षणिक मदत व भोजन देऊन समाजाकरिता एक आदर्श पुढे ठेवला. आईने साथ सोडून दीड वर्षे उलटले नाही तोपर्यंत वडीलांचे छत्र हरपून गेले. कुटुंबावर दुःखाचा डोंगर असतानाही आई-वडीलांनी दिलेल्या संस्काराचे पालन करीत मुलांना मदत केली.

जिजाऊ वसतिगृहाचे संस्थापक सलमा व समीर नदाफ यांनी मुलांवर केलेले संस्कार पाहता नदाफ दाम्पत्यांनी खरोखरच एक उत्तम प्रकल्प समाजासमोर ठेवला. येथे समाजातील सर्व थरांमध्ये दुर्लक्षित झालेली बालके आहेत. नदाफ दाम्पत्यांनी स्वतःच्या मुला-मुलींप्रमाणेच या 30 बालकांचा स्वीकार करून सर्वांना शिक्षण देत त्यांचे पालन पोषण करण्याचा नित्यक्रम 2015 पासून चालू आहे, हे कृतकृत्यर्थ करणारे आहे, असे गौरवोद्गार निखिल शहा यांनी काढले.

Patil Family Helped Jijau Vastigruh Kole
चिक्कोडीत ABVPकडून तीव्र आंदोलन; वसतिगृह सुरू करण्याची मागणी

आई सुशीला यांच्या निधनानंतर काही दिवसांत दिवाळीचे पदार्थ ऊस तोड कामगारांना देऊन त्यांची दिवाळी गोड केली होती. आई-वडीलांच्या दातृत्वाचे संस्कार कायम ठेवू आज निराधार मुलांना मदत दिली. हे पाऊल समाजासाठी आदर्शवत आहे, असे मत जावेद मुल्ला, संदीप पाटील यांनी व्यक्त केले.

'श्रद्धया क्रियते तत् श्राद्धम्' म्हणजे जे श्रद्धेने केले जाते ते श्राद्ध होय. पितरांविषयी आदर बाळगणे, त्यांच्या नावे दानधर्म करणे व त्यांना संतोष होईल अशी कृत्ये करणे हे वंशजांचे कर्तव्य आहे, असे धर्मशास्त्र सांगते. ज्ञानदेव पाटील यांनी अनेकांना शिक्षणासाठी मदत केली. तो वारसा जपण्याचे काम पाटील कुटुंबीयांनी केले आहे, असे प्रतिपादन शंकर चव्हाण यांनी केले.

Patil Family Helped Jijau Vastigruh Kole
माणुसकी! स्टार क्रिकेटर सराव करताना हेलिकॉप्टर उतरलं मैदानात अन्...

वसतिगृहातील मुलांनी शालेय परिपाठातील 'हीच आमुची प्रार्थना' सुंदररीत्या सादर केली. त्याचवेळी एका मुलाने लेखक शिव खेरा यांच्या पुस्तकातील प्रेरणादायी कथा सांगून स्वतःच्या जीवनातील ध्येय सांगितले. 'मला आमदार व्हायचंय' असे त्याने सांगताच सर्वांनी टाळ्या वाजवून त्याचे कौतुक केले.

पाटील कुटुंबीयांचे जिजाऊ वसतिगृहावर नेहमीच मायेचे छत्र राहिले आहे. मुलांच्या विकासात त्यांचाही सिंहाचा वाटा आहे. 30 मुलांचे संगोपन होण्यासाठी दानशुरांनी मदतीसाठी पुढे यावे, जिजाऊ वसतिगृहाचे संस्थापक समीर नदाफ यांनी म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com