esakal | भिशीचा फंडा येऊ लागलाय चालविणाऱ्यांच्या अंगलट?
sakal

बोलून बातमी शोधा

bhishis

कोरोना कालावधीत भिशी फुटताना ज्यांनी उचल घेतली आहे, त्यांनी परत पैसे न दिल्याने ‌‌भिशीला घरघर लागली आहे. त्यामुळे भिशी चालवणाऱ्या लोकांचे जीव टांगणीला लागल्याचे चित्र मोरणा विभागात आहे.

भिशीचा फंडा येऊ लागलाय चालविणाऱ्यांच्या अंगलट?

sakal_logo
By
अरुण गुरव

मोरगिरी (सातारा): ग्रामीण भागात भिशीत (फंड) आर्थिक गुंतवणूक करण्याकडे लोकांचा कल वाढत आहे. गरजू लोकांना गरजेवेळी पैसे मिळत असल्याने ग्रामीण भागात लोक अर्थवाहिनी म्हणून त्याकडे बघत आहेत. मात्र, कोरोना कालावधीत भिशी फुटताना ज्यांनी उचल घेतली आहे, त्यांनी परत पैसे न दिल्याने ‌‌भिशीला घरघर लागली आहे. त्यामुळे भिशी चालवणाऱ्या लोकांचे जीव टांगणीला लागल्याचे चित्र मोरणा विभागात आहे.

हेही वाचा: नवी मुंबई ते सातारा,जावळी प्रवासी भाडे ५०० ते ६०० रुपये; बसचालकांकडून लूट

मुंबईसह अन्य शहरांमध्ये काम करणाऱ्या चाकरमानी, व्यापारी, स्थानिकांनी आपल्या घरातील कुटुंबांना वेळेवर आर्थिक मदत व्हावी, म्हणून आयुष्यभर जमा केलेली पुंजी पतसंस्थेत किंवा बँकेत जमा करून ठेवली आहे. कोरोनाच्या काळात लोकांच्या मदतीला ना पतसंस्था आली ना बँक आली. त्यामुळे ग्रामीण भागात सुरू असलेल्या भिशीने गरजूंना आर्थिक मदतीचा हात दिला. भिशीत प्रत्येक जण महिन्याला ठरलेली ठराविक रक्कम भरत असतो. ती रक्कम यातील दोघांच्या नावावर बँकेत जमा केली जाते. गरजूंना कमीतकमी व्याज दरात उचल म्हणून कर्ज दिले जाते.

हेही वाचा: सातारा जिल्ह्यात 111 कामांसाठी 8.33 कोटी निधी मंजूर

यासाठी कोणतीच कागदपत्रे घेतली जात नाहीत. वेळेत आणि हमखास पैसे मिळत असल्याने लोकांच्या गरजा, अडचणी दूर होऊ लागल्या आहेत. पतसंस्थेत कर्ज घेण्यासाठी लोकांना संचालक मंडळाची विनवणी करावी लागते. गटातटाच्या राजकारणामुळे गरजू लोकांना कर्जपुरवठा केला जात नाही. त्यामुळे भिशी लोकांना वरदान ठरू लागली आहे. कोरोना काळात व अन्य तांत्रिक अडचणींमुळे फंडातून रक्कम घेतलेल्या व्यक्तीने पैसे भरले नसल्याचे अनेक उदाहरणे घडत आहेत. त्यामुळे भिशीस घरघर लागली असून, ती चालवणाऱ्यांचे जीव टांगणीला लागल्याचे चित्र मोरणा विभागात दिसत आहे.

loading image
go to top