esakal | सातारा जिल्ह्यातील 783 कंत्राटी कर्मचाऱ्यांची गेली नोकरी
sakal

बोलून बातमी शोधा

Health Department

कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेत कंत्राटी कर्मचारी कपात केल्याने नियमित आरोग्य कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण येणार आहे.

सातारा जिल्ह्यातील 783 कंत्राटी कर्मचाऱ्यांची गेली नोकरी

sakal_logo
By
प्रशांत घाडगे

सातारा: कोरोनाच्या काळात आरोग्य विभागाने भरती केलेल्या जिल्ह्यातील ७८३ हून अधिक कंत्राटी कर्मचाऱ्यांना कार्यमुक्त केले आहे. त्यामुळे, कोरोनाच्या काळात उभारलेल्या कोविड सेंटर, कंट्रोल रूम व इतर कामांवर प्रश्‍नचिन्ह उभे राहिले आहे. कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेत कंत्राटी कर्मचारी कपात केल्याने नियमित आरोग्य कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण येणार आहे.

हेही वाचा: सातारा शहराचे होणार गुगल मॅपिंग! नगरपालिकेची तयारी

दरम्यान, गेल्या तीन महिन्यांपासून नोकरीवर गंडांतर येणार असल्याची चाहूल लागल्याने कंत्राटी कामगारांनी आंदोलने, निवेदने दिली होती. मात्र, अखेर सरकारने हेकेखोरपणाची भूमिका घेऊन आरोग्य कर्मचाऱ्यांना रस्त्यावर आणले आहे. कोरोनाच्या संकटात आरोग्य विभागात कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्याने दीड वर्षापूर्वी कंत्राटी कर्मचाऱ्यांची भरती केली होती. कोरोनाच्या प्रादुर्भावात भीतीदायक वातावरण असतानाही कर्मचाऱ्यांनी कोविड सेंटर, प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रामध्ये जीव धोक्यात घालून काम केले, तरीदेखील कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांना राज्य सरकारने थेट घरचा रस्ता दाखविला आहे.

हेही वाचा: सातारा: जिल्‍हाधिकारी कार्यालयाच्‍या आवारात बिबट्या

त्यामुळे, आरोग्य विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यावर अन्याय झाला आहे. हे कर्मचारी वैद्यकीय अधिकारी, डाटा एंट्री, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, स्टाफ नर्स, क्ष- किरण तंत्रज्ञ, औषध निर्माण अधिकारी अशा विविध पदांवर काम करत होते. त्यामुळे आरोग्य विभागाला कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना आखताना सोयीचे ठरत होते. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव काहीसा कमी झाल्याचे दिसून येताच कर्मचाऱ्यांना कार्यमुक्त करण्याची शासनाने खेळी केली आहे.

हेही वाचा: सातारा : भुतेघर, वाहिटे, बोंडारवाडीची भूगर्भ शास्त्रज्ञांकडून पाहणी

पर्यायी व्यवस्था करून कामाचे नियोजन

कोरोनाच्या काळात कंत्राटी कर्मचारी कमी केल्याने कामावर कोणताही परिणाम होणार नाही, तसेच जिल्ह्यातील कोणतेही कोविड सेंटर बंद राहणार नाही. त्या ठिकाणी राष्ट्रीय आरोग्य विभागांतर्गत (एनएचएम) व इतर नियमित आरोग्य कर्मचारी काम करणार आहेत. त्यामुळे कंत्राटी कर्मचारी कमी झाले तरी पर्यायी व्यवस्था करून कामाचे नियोजन केल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राधाकिशन पवार यांनी सांगितली.

loading image
go to top