साताऱ्यात पंधरा दिवसांत चांगले परिणाम दिसतील; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना विश्वास

उमेश बांबरे
Friday, 4 September 2020

आशा स्वयंसेविका, गट प्रवर्तक, वैद्यकीय मदतीने संपूर्ण राज्यात घरोघर भेटी देऊन कुटुंबांच्या आरोग्याची चौकशी मोहीम राबविणार आहोत. ही तपासणी नसेल. यामध्ये घरातल्या कुणाला इतरही काही आजार आहेत का, त्यांचे आरोग्य कसे आहे, त्यांना न्यूमोनियासदृश काही लक्षणे आहेत का याविषयी पूर्ण माहिती विचारली जाईल.

सातारा : पश्‍चिम महाराष्ट्रात कोविडचा संसर्ग वाढत आहे, ही चिंतेची बाब आहे. कोरोना लढ्यासाठी राज्य शासन संपूर्णपणे सहकार्य करणार आहे. सुविधा कितीही उभ्या केल्या तरी काही प्रमुख मुद्‌द्‌यांवर लक्ष केंद्रित करणे आवश्‍यक आहे. यामध्ये एकेका रुग्णांमागचे जास्तीतजास्त संपर्क शोधा, चेस दि व्हायरस मोहीम अधिक गांभीर्यपूर्वक राबवा, कंटेनमेंट क्षेत्रात कडक नियम पाळा, चाचण्यांची संख्या वाढवा, घरोघर सर्वेक्षणाला अधिक गती द्या, तरच येत्या 15 दिवसांत चांगले परिणाम दिसतील, असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.
भिवा भदाणेचा तेरावा
 
मुख्यमंत्री ठाकरे यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे पुणे विभागातील सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील कोविड उपाययोजनांचा आढावा घेतला. या वेळी या सर्व जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक, निवासी उपजिल्हाधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक सहभागी झाले होते. सर्व जिल्ह्यांतील परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, ""मुंबई- ठाण्याकडून या साथीचा फोकस सातारा, सांगली, कोल्हापूरकडे सरकणे निश्‍चितच जबाबदारी वाढवणारे आहे.

आमच्यात भेदभाव कशासाठी?, सैनिकांचा सरकारला सवाल

कोरोना लढ्यात ज्या चुका यापूर्वी काही जिल्ह्यांकडून झाल्या. त्या पुन्हा होऊ देऊ नका. इतर देश केवळ कोविड एके कोविडचा मुकाबला करत आहेत. आपले तसे नाही. आता नवरात्र, दसरा, दिवाळी हे सण येतील. त्यातच पावसाळाही सुरू आहे. त्यामुळे आपले आव्हान अधिक मोठे असून, हाच कसोटीचा काळ आहे. सुविधा कितीही उभ्या केल्या तरी काही प्रमुख मुद्‌द्‌यांवर लक्ष केंद्रित करणे आवश्‍यक आहे. यामध्ये एकेका रुग्णांमागचे जास्तीतजास्त संपर्क शोधा, चेस दि व्हायरस मोहीम अधिक गांभीर्यपूर्वक राबविणे, कंटेनमेंट क्षेत्रात कडक नियम पाळा, चाचण्यांची संख्या वाढवा, घरोघर सर्वेक्षणाला अधिक गती द्या. हे सर्व पाळले तर 15 दिवसांत चांगले परिणाम दिसतील.'' 

भारीच की! सातारा जिल्ह्यात 60 कंपन्यांनी उभारले कोरोना केअर सेंटर

कुटुंब चौकशी मोहीम राबविणार.... 

आशा स्वयंसेविका, गट प्रवर्तक, वैद्यकीय मदतीने संपूर्ण राज्यात घरोघर भेटी देऊन कुटुंबांच्या आरोग्याची चौकशी मोहीम राबविणार आहोत. ही तपासणी नसेल. यामध्ये घरातल्या कुणाला इतरही काही आजार आहेत का, त्यांचे आरोग्य कसे आहे, त्यांना न्यूमोनियासदृश काही लक्षणे आहेत का याविषयी पूर्ण माहिती विचारली जाईल.

ही सातारकारांसाठीच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी अत्यंत वाईट बातमी : उदयनराजे

या जिल्हा बॅंकेची राज्यात सर्वोत्कृष्ट कामगिरी; तब्बल ९७ टक्के कर्जवसुली!

Edited By : Siddharth Latkar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Increase Contact Tracing In Western Maharashtra Says CM Uddhav Thackeray