esakal | नवरात्र उपवासामुळे फळांच्या दरात वाढ; बाजारपेठेत देशीसह परदेशी फळांची रेलचेल
sakal

बोलून बातमी शोधा

Satara

नवरात्र उपवासामुळे फळांच्या दरात वाढ; बाजारपेठेत देशीसह परदेशी फळांची रेलचेल

sakal_logo
By
दिलीपकुमार चिंचकर

सातारा : देशी फळांसह परदेशी फळांनीही शहरात मोठ्या प्रमाणावर फळांच्या गाड्यांवर ठाण मांडले असून, नवरात्रीतील (Navratri) उपवासामुळे बाजारपेठेत फळांची रेलचेल झाली आहे. राजवाड्यापासून बस स्थानक परिसरासह महामार्गापर्यंत सर्वत्र फळांचे गाडे विविध प्रकारच्या फळांनी भरून गेले आहेत. दरम्यान, मागणी वाढल्याने फळांच्या दरात किंचित वाढ झाली आहे.

नवरात्राच्या कालावधीत महिला नऊ दिवस कडक उपवास करतात. काही महिला एक वेळ जेवण व एक वेळ फळांचा आहार घेतात, तर अनेक महिला नऊ दिवस भोजन न घेता फक्त फलाहार करतात. त्यामुळे साहजिकच नवरात्रीत फळांना मागणी वाढली आहे. गणेशोत्सवापासूनच ही मागणी वाढलेली असते. यावर्षी नवरात्रातील मागणी पाहून विक्रेत्यांनी मोठ्या प्रमाणावर फळे विक्रीस आणली आहेत. एकवेळ उपवास करतात, त्यामुळे फराळासाठी एक वेळ शाबुदाणा वापरतात. किराणा दुकानांतून शाबुदाण्यासही मागणी वाढली आहे. मात्र, शाबुदाणा, शेंगदाण्याच्या किमती स्थिर आहेत. राजवाडा परिसर, बस स्थानक, पोवई नाका आणि शहरात पाहावे तिकडे फळांचे हातगाडे उभे असलेले दिसतात. आता विक्रेत्यांची संख्याही मोठी वाढली आहे.

हेही वाचा: विराट IPL खेळतोय आणि तिकडे बाबर त्याचा रेकॉर्ड मोडतोय

नवरात्रात नव्या पाहुण्यांकडे फराळाचे ताट फळांनी भरून नेण्याची प्रथा आहे. त्यामुळेही मागणीत थोडी भरच पडली आहे. या उपवासात खजूरही खाल्ले जाते. सध्या खजूर त्याच्या प्रकाराप्रमाणे साधारण ८० ते २७० रुपये किलो आहे. उपवासात रताळी, केळी आणि सफरचंदाचाच जास्त उपयोग केला जातो. दर्जेदार केळी साधारण ४० ते ५० रुपये डझन आहेत. यावर्षी रताळी साधारण ५० रुपये किलो मिळत आहेत.

फळांचे दर (किलो) रुपयांत

सफरचंद सिमला - १०० ते १५०

चिक्कू - ६० ते १००

मोसंबी - १००

संत्री - १५० ते २००

डाळिंब - ६० ते १००

पेरू- ६० ते १००

केळी - ४० ते ५०

खजूर - ८० ते २७०

loading image
go to top