esakal | Good News : मोरणा-गुरेघर धरणात 52 टक्के पाणीसाठा; शेतकऱ्यांना मोठा दिलासा
sakal

बोलून बातमी शोधा

Morna Gureghar Dam

Good News : मोरणा-गुरेघर धरणात 52 टक्के पाणीसाठा; शेतकऱ्यांना मोठा दिलासा

sakal_logo
By
अरुण गुरव

मोरगिरी (सातारा) : वळीव पावसाने मोरणा-गुरेघर धरणातील (Morna Gureghar Dam) पाणीसाठ्यात (Rain) दोन टक्‍क्‍यांनी वाढ झाली आहे. धरणामध्ये सध्या 52 टक्के पाणीसाठा (Water Availability) शिल्लक आहे. मे महिना संपण्यास दहा दिवसांचा कालावधी शिल्लक असताना धरणामध्ये मुबलक पाणीसाठा राहिल्याने शेतकऱ्यांचा सिंचनासह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे. (Increase In Water Availability In Morna Gureghar Dam Due To Rain Satara News)

पाटण तालुक्‍यातील मोरणा नदीवर गुरेघरला धरणातील पाणी डाव्या आणि उजव्या कालव्याच्या माध्यमातून परिसरातील शेतीला पाणीपुरवठा केला जाणार आहे. धरणाच्या पाण्यावर पाटण, कऱ्हाड तालुक्‍यांतील दोन हजार 672 हेक्‍टर क्षेत्र ओलिताखाली येईल. पावसाळा सुरू होण्यापूर्वीच धरणात असलेला पाणीसाठा विभागातील शेतकऱ्यांच्या सिंचनासाठी पुरेसा शिल्लक राहिला आहे. मुबलक पाणीसाठा राहिल्याने शेतकऱ्यांचा सिंचन आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे. धरणातून पाणी सोडण्यात आले असले तरीही सिंचनासाठी मुबलक पाणीसाठा शिल्लक राहिला असल्याची माहिती मोरणा-गुरेघर धरण मध्यम प्रकल्पाचे सहायक अभियंता सागर खरात यांनी दिली.

वांग खोऱ्याच्या मातीतला शेरदिल सुपुत्राची जगण्याची लढाई जरुर वाचा

Increase In Water Availability In Morna Gureghar Dam Due To Rain Satara News

हेही वाचा: तेरे जैसा यार कहाँ, कहाँ ऐसा याराना! वर्येत मित्राच्या स्मृतीसाठी साकारलं 'मैत्रीचं झाड'

loading image